
देवगड : तहसिलदार पवार यांच्याकडून देवगड तालुक्यातील १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून यावेळी माध्यमिक शालांत परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल 98.52 टक्के लागला आहे.
यानिमित्त सर्व गुणवंत विदयार्थ्यांना प्रोत्सहान व इतर विदयार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी तहसिदार रमेश पवार यांनी आपल्या दालनात १० वी च्या गुणवंत्तांचा सत्कार केला. यावर्षी १० वीच्या निकालात उमा मिलींद पवार देवगड इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेचा विद्यार्थी पियुष सुनिल राठोड याने 98.80 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. पियुष हा मिठबांव मंडळ अधिकारी सुनिल राठोड यांचा चिरंजीव असून देवगड महसूल कर्मचारी यांनी देखील त्याला शुभेच्छा देत कौतूक केले. शेठ म.ग. हायस्कूल देवगडची विद्यार्थीनी सारा जावेद खान ही 98.60 टक्के गुण मिळवून व्दीतिय व जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कुलची विद्यार्थीनी लोचन भगत व आदर्श विद्यामंदीर किंजवडे या हायस्कूलची विद्यार्थीनी कुमारी आर्या जोईल यांनी 97 टक्के गुण मिळवुन तालुक्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
परीक्षेला एकूण 1354 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 1334 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष श्रेणीत 372, प्रथम श्रेणीत 525, द्वितीय श्रेणीत 353 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तहसिलदार पवार यांनी गुणवंत विदयार्थ्यांना बहूमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी निवासी नायब तहसिलदार विवेक शेठ, महसूल नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर, विदयार्थी, त्यांचे शिक्षक, पालक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. परीक्षेला एकूण 1354 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 1334 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष श्रेणीत 372, प्रथम श्रेणीत 525, द्वितीय श्रेणीत 353 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रदिप कदम यांनी मानले.