
सावंतवाडी : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा - सावंतवाडी तर्फे त्रैवार्षिक अधिवेशन व विद्यार्थी - शिक्षक गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार ७ जुलै २०२४ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत तालुकाध्यक्ष संजय शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली काझी शहाबुद्दीन सभागृह, प्रांत कार्यालयासमोर सावंतवाडी येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी राज्य सल्लागार प्रकाश दळवी, राज्य संयुक्त चिटणीस म.ल.देसाई, राज्य कोषाध्यक्षा विनयश्री पेडणेकर, राज्य संघटक प्रशांत पारकर, जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग राजाराम कविटकर, सरचिटणीस सिंधुदुर्ग बाबाजी झेंडे, जिल्हाध्यक्षा, महिला सेल, संजना ठाकुर, जिल्हा सचिव, महिला सेल, सीमा पंडीत आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रविवार ७ जुलै २०१४ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वा. काझी शहाबुद्दीन सभागृह, प्रांत कार्यालयासमोर, बस स्थानक जवळ, सावंतवाडी येथे हा सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी उपस्थिती रहाण्याचे आवाहन कार्याध्यक्ष महेश पालव, सरचिटणीस अमोल पाटील, कोषाध्यक्षा सौ. नेहा सावंत, अध्यक्षा, महिला सेल,, सौ. वंदना सावंत, सचिव महिला सेल सौ. तेजस्विता वेंगुर्लेकर आदींनी केले आहे.