सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सभासद पाल्यांचा गुणगौरव समारंभ ८ ऑगस्टला

यावर्षीच्या दहावी, बारावी व शिष्यवृत्ती धारकांचा होणार गौरव
Edited by:
Published on: July 05, 2024 14:09 PM
views 137  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या  सभासद पाल्यांचा  गुणगौरव समारंभ  ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वा. सिंधुनगरी येथील  आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व पत्रकार भवन सभागृहात  होत आहे. सन २०२४ मध्ये दहावी, बारावी  व शिष्यवृत्ती धारक  पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा  सत्कार  मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या गुणगौरव सोहळ्यासाठी  पत्रकार सभासदांनी  उपस्थित रहावे  असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील यावर्षी दहावी बारावी  व शिष्यवृत्ती परीक्षेत  यश संपादन करणाऱ्या पत्रकार सभासदांच्या मुलांचा या कार्यक्रमात  सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका व मुख्यालय पत्रकार संघानी आपली गुणवंत विद्यार्थ्यांची यादी दहावी, बारावी व शिष्यवृत्ती  अशा गुणांसह  पत्रकार संघाच्या सचिव श्रीमती देवयानी वरसकर यांचेकडे पोहच करावी. 

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या घटना दुरुस्ती बाबत  निर्णय घेण्यासाठी याच दिवशी म्हणजे  ८ ऑगस्ट रोजी पत्रकार संघाची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. तालुका पत्रकार संघाने घटना दुरुस्ती बाबत  केलेल्या शिफारसी  तसेच जिल्हा कार्यकारणी सभेतील सूचना व मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्त केलेल्या  घटना दुरुस्त  समितीच्या शिफारशीनुसार  घटना दुरुस्तीचा तयार झालेला मसुदा या सभेत ठेवून मंजूर केला जाणार आहे. या सभेस जिल्हा पत्रकार संघाच्या सभासद पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले आहे.