
सावंतवाडी : पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांनी वनविभागाच्या दोन वनपालांवर योग्य ती कारवाई केली नसल्याने सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे व तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्यावर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी कारवाई करावी अशी मागणी जयंत बरेगार यांनी केली आहे. तो बदली पास हा विषय होता. त्यात मोठे काहीच नाही. कारण बदली पास म्हणजे एखादी गाडी लाकूड भरायला आली आणि ती नादुरुस्त किंवा शेतकऱ्यांच्या मार्गावरील अडचण उदा. मोठा पाऊस पडला की शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बदली पासाचा मुद्दा उल्लेखित होतो. तसेच जयंत बरेगर यांच्या मालवण आडवली येथील सॉमिलवर तत्कालीन वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. ती चुकीचीही असू शकते. त्याचे आम्ही समर्थन करुच शकत नाही. परंतु तो अधिकारी सुद्धा निवृत्त झाला व त्या कारवाईच्या रागाने जयंत बरेगर यांनी वनविभागावर रोष ठेवला. परंतु या संदर्भात दोन्ही वनपाल व दोन पोलीस निरीक्षक, एक हेड काँस्टेबल यांचा तसूभरही संबंध नसताना त्यांना त्रास होत आहे. याचा बरेगर यांनी सौजन्यपुर्वक विचार करावा. तसेच फुलचंद मेंगडे यांची कारकिर्द अतिशय प्रामाणिक व सत्य जाणून घेऊन चांगल्या पद्धतीने सुव्यवस्था राखणे अशी यापूर्वी नोकरी केलेल्या ठिकाणी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे एखाद्या चांगल्या व प्रामाणिक अधिकाऱ्याला झळ बसू नये अशी माझी व सर्वसामान्यांची मागणी आहे असं मत माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी व्यक्त केल आहे.