शिवसेनेच्या सभासद नोंदणीला मंत्री केसरकरांच्या उपस्थितीत शुभारंभ

Edited by: विनायक गावस
Published on: June 26, 2023 14:30 PM
views 120  views

सावंतवाडी : शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाची सभासद नोंदणी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना सभासद करून सावंतवाडी तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. शिवसेना बाळासाहेब ठाकरे प पक्षाचे सभासद नोंदणी करण्यात येत असून स्थानिक आमदार तथा मंत्री दीपक केसरकर यांना सभासद करून तिचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, संजय आंग्रे, तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी उपसभापती विनायक दळवी, गुंडू जाधव, संजय माजगावकर, गजानन नाटेकर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी तालुक्यात पाच हजार सभासद नोंदणी करणार असल्याचे सांगितले.