
सावंतवाडी : शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मेगा ऑर्थोपेडिक कॅम्प दि.१८ ते २३ जुलै या काळात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ व ना. दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने लोकमान्य हाॅस्पीटल पुणे यांच्या सौजन्याने मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्ताने मेगा ऑर्थोपेडिक कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अस्थिरोग तज्ज्ञांच्या मार्फत मोफत गुडघेदुखी,खांदेदुखी, पाठदुखी कंबरदुखी,लिगामेट इज्युंरी,सपाट पाय, घोट्याचे दुखणे,खुब्याच्या वेदना, खेळात होणाऱ्या दुखापती, चालताना त्रास होणे व सर्व प्रकारच्या हाडांचे आजारांवर तपासणी करण्यात येणार आहे.
यासाठी मंगळवार दि.१८ जुलै सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालय शिरोडा, बुधवार दि.१९ जुलै रोजी सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले, गुरुवार दि.२० जुलै रोजी सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालय दोडामार्ग, शुक्रवार दि.२१ जुलै रोजी सकाळी दहा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी, शनिवार दि.२२ जुलै सकाळी दहा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा, रविवार दि.२३ जुलै रोजी सकाळी दहा वाजता उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरा संबंधी अधिक माहितीसाठी राजेंद्र पोकळे मोबाईल नंबर ९५७९४६३५२६ तसेच नितीन मांजरेकर (वेंगुर्ले), गणेशप्रसाद गवस (दोडामार्ग), नारायण राणे (सावंतवाडी), गजानन नाटेकर (सावंतवाडी) यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच आवश्यक असल्यास मोफत डिजिटल एक्स रे काढण्यात येईल. या शिबिरात सहभागी होताना जुने वैद्यकीय रिपोर्ट असतील तर घेऊन यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.