शिरोड्यातील 'ताज' 5 स्टार हॉटेलबाबत पर्यटनमंत्र्यांशी बैठक

ताज समुहाच्या प्रतिनिधींसह पालकमंत्री राणे - आ. केसरकरांची उपस्थिती
Edited by: विनायक गांवस
Published on: December 23, 2025 13:59 PM
views 142  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी वेंगुर्लेमधील मधील शिरोडा-वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिले '5 स्टार हॉटेल' उभारले जाणार आहे. शिरोडा वेळाघर येथील जमिनीबाबत मे.इंडियन हॉटेल कंपनी प्रा.लि.यांनी सादर केलेल्या पुरक करार पत्राबाबत आज पर्यटन मंत्री श्री.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ताज समुहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. 


या हॉटेलसंदर्भात MTDC, ग्रामस्थ आणि ताज समुहाबरोबर लवकर सामंजस्य करार करण्यात येणार असून ग्रामस्थांना दोन टप्य्यांमध्ये मोबदला देण्यात येणार आहे. हा मोबदला एक ते दोन हफ्त्यात द्यावा व यासंदर्भातील सर्व केसेस मागे घेण्यात याव्या अशा सूचना यावेळी बैठकीत संबंधितांना देण्यात आल्या. 


या बैठकीस पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (ऑनलाईन), ताज समुहाचे प्रतिनिधी, संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.