सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेची 5 ऑगस्टला कुडाळात सभा

Edited by: ब्युरो
Published on: August 03, 2023 19:24 PM
views 314  views

कुडाळ : जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्यां सोडविण्यासाठी महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेला संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटना जिल्ह्यात कार्यरत आहे.

       पावसाळा सुरू झाल्या पासुन जिल्ह्यातील विज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विज खंडित होण्याचे प्रकार दैनंदिन घडत आहेत. काही भागातील नागरिकांना आठ-आठ दिवस वीजेवीना काळोखात घालवावे लागत आहे.  विज ग्राहकांना वीजवितरण कंपनीच्या दर्जाहीन सेवेचा नाहक ञास होत असताना विज दरात मात्र भरमसाठ वाढ केली जात आहे.  अशा विजेबाबत विविध समस्या सोडविण्या संदर्भात पुढिल रूप रेषा ठरविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटनेची तातडीची सभा शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता अनंत मुक्ताई हॉटेल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे आणि एकमताने निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व आठही तालुक्यातील वीजे संदर्भातील समस्या समजून घेणे तसेच या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी तालुकानीहाय कार्यकारिणी गठीत करणे, ग्राहक मेळाव्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेणे, जिल्ह्यातील विविध भागातील विज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करणे अशा  विविध विषयांवर चर्चा करून ठोस भुमिका घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील विज समस्यां सोडविणे व विज ग्राहकांना न्याय देणे हा या संघटनेचा हेतू  असल्याने विजे बाबत तक्रार असलेले नागरिक, संघटनेचे पदाधिकारी तसेच विज ग्राहक संघटनेच्या तालुका व जिल्हा कार्यकारीणीत काम करु इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी या सभेला उपस्थित राहून सहकार्य करावे. असे अवाहन वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व समन्वयक यांनी केले.