चौकुळ ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक !

'तो' प्रश्न संपुष्टात येईल, मंत्री केसरकरांचा विश्वास महायुतीत जे 'आमदार' तेच उमेदवार : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: August 12, 2024 14:45 PM
views 76  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बुधवार १४ ऑगस्ट रोजी चौकुळच्या कबुलायतदार गांवकर प्रश्नी  बैठकीच आयोजन करण्यात आल आहे. मुख्य मुद्दा जमिनींवर लागलेली वनसंज्ञा रद्द करण हा आहे. वन व महाराष्ट्र शासन लागलेल्या जमिनींच एकत्रित वाटप करण्यात यावं अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यामुळे वाटपास विलंब झाला. बैठकीत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय देतील व ग्रामस्थांना जमीनींच देखील वाटप होईल. चौकुळच्या निर्णयानं हा प्रश्न पुर्णपणे संपुष्टात येईल असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, चौकुळच्या ग्रामस्थांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 14 ऑगस्ट रोजी ४.वा. सह्याद्री अतिथी गृहावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. आंबोली, गेळेचा प्रश्न सुटला आहे. मात्र, चौकुळचा प्रश्न थोडा वेगळा आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची त्यांची मागणी होती. यात मुख्य मुद्दा कबुलायतदार जमिनींवर लागलेली वनसंज्ञा रद्द करण हा आहे. वन व महाराष्ट्र शासन लागलेल्या जमिनींच एकत्रित वाटप व्हावं अशी ग्रामस्थांची मागणी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत सकारात्मक निर्णय देतील. जमीनीवर लागलेली वनसंज्ञा हटवली जाईल व ग्रामस्थांना कबुलायतदार जमीनींच देखील वाटप होईल. चौकुळच्या निर्णयान हा प्रश्न पुर्णपणे संपुष्टात येईल असं मंत्री केसरकर म्हणाले. तर, वाटप या पुर्वीच झालं असतं. मात्र, ग्रामस्थांची मागणी दोन्ही जमिनींच वाटप एकत्र करण्यात यावं अशी होती. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेली स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली. यासाठी मी पाठपुरावा केला. मात्र, मला कोणतीही गोष्ट श्रेयासाठी करायची नाही. हा प्रश्न सुटण्यासाठी मी लढा दिला. ही गावं माझ्या कुटुंबासारखी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक निर्णय देतील व सर्वांनाच जमिनींच वाटप होईल असं मत त्यांनी व्यक्त केले.

महायुतीत जे 'आमदार' तेच उमेदवार !

महायुतीत ज्या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे घोषित झालेल आहे. अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. कार्यकर्तांना नाराज करता येत नाही. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील. तर मागीलवर्षीसह यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल ध्वजारोहण माझ्याहस्ते होणार आहे अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली. 

नितेश राणेंशी चांगले संबंध !

आमदार नितेश राणे यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. ज्येष्ठत्वानुसार त्यांनी ते विधान केलं असेल. मात्र, महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनीच एकत्र राहील पाहिजे हे मी सांगितलेल आहे. निश्चितच नितेश राणे मोठ्या फरकाने निवडून येतील. बाळासाहेब व नारायण राणे यांचं नातं वेगळं होतं. शिवसेनेशी त्यांची जवळीक राहीलेली आहे. राणेंची सुरुवातच शिवसेनेतून झालीय. त्यामुळे हे संबंध असेच कायम रहावे, त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांसोबत रहावं अशीच आमची भुमिका असणार आहे असं मत व्यक्त केले. जिल्ह्यातील महायुतीबाबत बोलण्यास केसरकरांच नेतृत्व पुरेसं आहे. आजूबाजूच्या नेत्यांना लुडबुड करू देऊ नका या नितेश राणेंच्या विधानाबाबत विचारलं असता ते बोलत होते.