भजनी मंडळ महिलांची २४ फेब्रुवारीला सभा

Edited by:
Published on: February 23, 2025 11:40 AM
views 201  views

सिंधुदुर्गनगरी : भजन क्षेत्राशी संबंधित महिलांची २४ फेब्रुवारी रोजी कणकवली येथील भालचंद्र महाराज मठात सकाळी १० वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्व महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधू रत्न भजन सुधारक मंडळ सिंधुदुर्ग चे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महिला भजनी बुवा आणि डबलबारी भजनी बुवा यांची तातडीची सभा सोमवारी आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेसाठी सिंधुदुर्गातील सर्व महिला भजनी बुवांनी, मग ते भजन स्पर्धेमध्ये भाग घेणारे असो, सिंगल भजन सेवा देणारे असो किंवा डबलबारी भजन करणारी असो, ज्या ज्या महिलांचा भजन क्षेत्राशी संबंध आहे

अशा सर्व महिला भजनी बुवांनी महिला रसिकांनी, महिला वादकांनी या सभेसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत डबलबारी साठीची नियमावली जाहीर करण्यात आली होती.  उद्याच्या सभेमध्ये चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या डबलबाऱ्या, भजन यांना आळा घालण्यासाठी तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भजन क्षेत्राशी निगडीत सर्व महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी केले आहे.