
सावंतवाडी : निरवडे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय तानावडे यांच्या प्रयत्नातून आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णोपयोगी साहित्य देण्यात आले आहे. यात बेडशीट आदी साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ.पाताडे यांच्याकडे सुपूर्द. करण्यात आले.
यावेळी ठाकरे शिवसेना शाखाप्रमुख संदीप बाईत, सामाजिक कार्यकर्ते संजय तानावडे,दशरथ पेडणेकर, डॉ. लंबे आदी उपस्थित होते.दरम्यान निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला यापूर्वी सुद्धा श्री तानावडे यांच्या प्रयत्नातून बऱ्याच रुग्णोपयोगी वस्तू देण्यात आल्या आहेत. यापुढे सुद्धा रुग्णांना चांगली सेवा मिळण्यासाठी अशा प्रकारच्या वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे असा विश्वास श्री तानावडे यांनी व्यक्त केला. तर कोणालाही प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णोपयोगी वस्तू द्यायच्या असतील तर त्यांनी श्री तानावडे यांच्याकडे संपर्क करावा असेही आवाहन त्यांनी केले आहे. तर याप्रसंगी माजी आमदार परशुराम उपरकर यांचे श्री तानावडे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि रुग्णांनी आभार व्यक्त केले.