
सिंधुदुर्गनगरी : मुंबई परिसरात व पर जिल्हयातून जिल्हयात येणाऱ्या नागरीकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी विविध ठिकाणी १८ वैद्यकीय पथके तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हयातील नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने स्थायीक झालेले मूळ सिंधुदुर्ग रहिवासी मुंबई, पुणे, गोवा इत्यादी भागातून तापसरीचे, तसेच हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीम, जोखमीच्या भागातून जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी घरी येतात. या येणाऱ्या व्यक्तीमार्फत वरील रोगाचा जिल्हयात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हयातील प्रमुख बस स्थानके रेल्वेस्टेशन व चेकपोष्ट येथे दि.३.९.२०२४ ते ६.९.२०२४ या कालावधीत उपचार व निदान पथकाची स्थापना करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात या ठिकाणी होणार तपासणी केंद्र
१) रेल्वेस्टेशन कणकवली,२) रेल्वेस्टेशन सावंतवाडीरोड (मळगांव),३) रेल्वेस्टेशन कुडाळ ४) रेल्वेस्टेशन वैभववाडी५) रेल्वेस्टेशन सिंधुदुर्गनगरी ६) एस.टी. स्टॅण्ड मालवण,७) एस.टी स्टॅण्ड वेंगुर्ला,८)एस.टी.स्टॅण्ड बांदा,९) एस.टी. स्टॅण्ड कणकवली,१०) एस.टी स्टॅण्ड देवगड,११) एस.टी.स्टॅण्ड सावंतवाडी,१२) एस.टी. स्टॅण्ड कुडाळ,१३) चेकपोष्ट आंबोली
१४) चेकपोष्ट फोंडाघाट,१५) चेकपोष्ट खारेपाटण,१६) जि.प. दवाखाना भुईबावडा, १७) चेकपोष्ट इन्सुली,१८) चेकपोष्ट दोडामार्ग