
देवगड : समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या सयुक्त विदयामाने सेलिब्रेशन ऑफ भारतीय शिक्षा समागम(ABSS) 2025 अंतर्गत दिनांक 29 जूलै पासून तालुकास्तरीय वैदयकिय निदान शिबिरे आयोजन करण्यात आले आहे .
या शिबीरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या दृष्टिकोनाशी सुसंगत, ज्यामध्ये विशेष गरजा असलेल्या मुलांसह (CWSN) सर्व मुलांसाठी समावेशक, समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे, त्याअनुषंगाने शिक्षण व्यवस्थेतील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यास 5 वर्षे पूर्ण झाली असल्याने अखिल भारतीय शिक्षा समागम (ABSS) या राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांसाठी तालुका-स्तरीय स्क्रीनिंग आणि मूल्यांकन शिबिरांच आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दिनांक ३१ जुलै रोजी बाहय फिजिओथेरपि स्थळ गट संसाधन केंद्र देवगड , दिनांक १ सप्टेंबर रोजी दृष्टीदोष स्थळ ग्रामीण रुग्णालय देवगड, दिनांक २ सप्टेंबर अस्थिव्यंग स्थळ ग्रामीण रुग्णालय देवगड , दिनांक २ ते ४ सप्टेंबर UDID रेजिस्टेशन स्थळ गट संसाधन केंद्र देवगड येथे आयोजित करण्यात आले असून तरी वरील तपासणी आवश्यक असलेल्या देवगड तालुक्यातील इयत्ता १ली ते १२वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी देवगड मुकुंद शिनगारे यांनी केले आहे.