जिल्हाधिकारी यांची मध्यस्थी | कोंडुरा येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित

Edited by:
Published on: June 14, 2024 11:18 AM
views 438  views

सिंधूदुर्गंगरी : वेंगुर्ले तालुक्यातील कोंडुरा येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेले बेमुदत उपोषण आज जिल्हाधिकारी यांनी 6 जुलै नंतर बैठक घेण्याचे निश्चित केल्या नंतर  चौथ्या दिवशी सायंकाळी 7 वाजता मागे घेतले आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील खानोली कोंडूरा ते येरम लिंगाचे देवालय या नियमबाह्य व बेकायदेशीर रस्त्याबाबत कोंडुरा येथील अन्यायग्रस्त शेतकरी प्रशांत पेडणेकर, नारायण पेडणेकर ,नीता पेडणेकर ,प्रणाली पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून गेल्या चार दिवसापासून योग्य उत्तर न मिळाल्यामुळे सर्व उपोषणकर्ते आपल्या निर्णयावर ठाम होते मात्र आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी उपोषणकर्त्यांसोबत पदवीधर निवडणुकीच्या आचारसहिता संपल्या वर 6 जून नंतर उपोषणकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय दिला जाईल असे आश्वासन दिल्याने व योगेश तांडेल यांनी कोकण आयुक्त यांचेकडे दिलेल्या अर्जानुसार कोकण आयुक्त यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश प्राप्त झाल्याने गेल्या चार दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत उपोषण वायंगणी कोंडुरा येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसह योगेश तांडेल यांनी आज सायंकाळी ७ वाजता मागे घेतले आहे.