
कुडाळ : माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी निवडणूकीचे निकाल हाती आलेत. आठ जागांपैकी शिक्षक भारतीने पाच जागांवर विजय मिळवून मुसंडी मारली आहे. अध्यापक संघाने तीन जागांवर विजयी मिळवलाय. कुडाळ, मालवण, सावंतवाडी, देवगड, दोडामार्ग तालुक्यात शिक्षक भारतीने मुसंडी मारलीय. तर कणकवली, वेंगुर्ले आणि वैभववाडीत अध्यापक संघाने बाजी मारली आहे.
वैभववाडीतून अध्यापक संघाचे जे.के.पाटील विजयी झाले आहेत. तर दोडामार्ग मधून शिक्षक भारतीचे शरद बाजीराव देसाई २१ मतांनी विजयी झाले आहेत. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी निवडणूक निकालामध्ये कुडाळ मध्ये शिक्षक भारतीचे रमाकांत सखाराम नाईक-83 मते तर गोपाळ हरमलकर-80 मते मिळाली आहेत. शिक्षक भारतीचे रमाकांत नाईक हे तीन मतांनी विजयी झाले आहेत. गोपाळ हरमलकर यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तर वेंगुर्लेतून अध्यापक संघाचे आशीष शिरोडकर विजयी झाले आहेत. सावंतवाडीतून शिक्षक भारतीचे प्रदीप सावंत विजयी झाले आहे.
शिक्षक परिषद, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक सेना पॅनल आणि दिनेश म्हाडगुत यांच्या मराठा महासंघ पॅनलला मोठा धक्का बसला असून खातेही खोलता आलेले नाही.