एमसीएल कंपनीचे दोडामार्ग बायोफ्युल्स कंपनीनं मारला पहिला गोल; प्रजासत्ताक दिनी झाला महाराष्ट्रातील पहिल्या एमकोल युनिटचा शानदार शुभारंभ!

सासोली येथे दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
Edited by: संदीप देसाई
Published on: January 26, 2023 12:34 PM
views 194  views

दोडामार्ग : मीरा क्लिनफ्युएल्स लिमिटेड व दोडामार्ग बायोफ्युएल्स प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड आणि दोडामार्ग क्लिनफ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज सासोली येथे दोडामार्ग क्लिनफ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा शानदार उदघाटन समारंभाचा झाला शुभारंभ// एमसीएल कंपनीचे दोडामार्ग बायोफ्युल्स कंपनीनं मारला पहिला गोल//

प्रजासत्ताक दिनी झाला महाराष्ट्रातील पहिल्या एमकोल युनिटचा शानदार शुभारंभ  //

दोडामार्ग क्लिनफ्युल्स प्रा. लि. यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यात नेपिअर हत्ती गवतापासून 'एम कोल' (नैसर्गिक कोळसा) बनवण्याची पहिली फॅक्टरी दोडामार्ग सासोली येथे उभारण्यात आली//

  सासोली भटवाडी दोडामार्ग याठिकाणी संपन्न झाला उदघाटन समारंभ //

 उद्घाटन सोहळ्यास खास मीरा क्लिनफ्यूल्सचे डायरेक्टर डॉ. लवेश जाधव, एस.एस.के. भारत मॅनेजमेंटचे डायरेक्टर कार्तिक रावल, ॲड. श्यामशंकर उपाध्याय, दोडामार्ग क्लिनफ्युल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर हरिहर मयेकर, कॉनबॅकचे मोहन होडावडेकर, रमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती// निखील ढोकरे, सागर सांगेलकर, राजेंद्र खडगे, वैभव पवार, प्रज्ञा भैरे, दिगंबर रासम, श्री. नाईक, रामा अर्जून सडजी, प्रगती पालंडे आदींचीही उपस्थिती// शेतकऱ्याच्या सोबत नेपिअर हत्ती गवत लागवडीचे रुपये १०००/- प्रति टन खरेदी करण्याच्या लेखी कराराचा शुभारंभ यावेळी झाला//दोडामार्ग मधील ससोली गावाच्या १० किलोमीटर अंतरावरील सभासद शेतकऱ्यांचे नेपिअर गवत कंपनी हमीभावाने खरेदी करून,  कंपनी नेपिअर गवताची  वाहतुक करणार//मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड व दोडामार्ग  बायोफ्युल्स प्रोड्युसर कंपनी सोबत ३७ गावचे ग्राम उद्योजक जोडले गेले आहेत// तसेच १३८४७ शेतकरी सभासद झाले आहेत.सासोली गावातील प्लांट मध्ये कर्मचारी कंपनी ऍक्ट नुसार नेमणूक केली जाणर असून तोडणी वाहतूकसाठी ही नोकरदार नेमणूक व वाहन कंत्राट केले जाणार आहेत. रोज १०० टन नेपिअर गवताची या प्लांटला गरज असून त्यापासून m-COAL (नैसर्गिक कोळसा) ३३ टन इतका तयार होणार आहे.// मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड कंपनी कडे दररोज ५४००० टन m-COAL (नैसर्गिक कोळसा) ची ऑर्डर बुक करण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यात पूढील एक वर्षात अजून दोन m-COAL (नैसर्गिक कोळसा) चे प्लांट मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड व दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभा केले जाणार आहेत. m-COAL (नैसर्गिक कोळसा) हा उत्तम दर्जाचा कोळसा तयार होणार असून याची उष्मांक मूल्य हे अत्यंत दर्जेदार असून त्याच्या पासून कोणतेही प्रदूषण होणार नाही. हा दगडी कोळसा, फरनेस ऑइल, LDO ला या पद्धतीच्या जीवष्म इंधनाला इकोफ्रेंडली पर्याय उभा रहाणार आहे.  m-COAL (नैसर्गिक कोळसा) लाईट निर्मिती, फौंड्री व्यवसाय, हॉटेल व्यवसायीक, MIDC, कापड उद्योग यांच्या साठी खूप उपयुक्त असणार आहे.जैव इंधन निर्मिती (m-CNG व m-COAL), सेंद्रिय खत निर्मिती, इकोफ्रेंडली प्रॉडक्ट, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेती उत्पादने असे वेगवेगळ्या माध्यमातून कंपनी शेतकऱ्याच्या सोबत जोडली जाणार असून, वार्षिक ₹ ३००० कोटीचे शेती उत्पादने निर्मितीचे उद्देश आहे.  मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड व दोडामार्ग बायोफ्युल्स  प्रोड्युसर कंपनी मधील व्यवसाय फायद्यातील २०% रक्कम तालुक्याच्या विकासासाठी (CARPORATE SOCIAL RESPONSIBILITY) खर्च केला जाणार आहे.या माध्यमातून तालुक्यात शेतकऱ्यांना रोजगार, चांगले उत्पादन होणार असून, दोडामार्ग तालुका सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदत होईल असा विश्वास दोडामार्ग क्लिनफ्लुल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर हरिहर मयेकर यांनी व्यक्त केला //