एमसीएल कंपनीने दिले युवकांना अपॉइंटमेंट लेटर्स ; सिंधुदुर्ग जिल्हा बेरोजगारी मुक्त करणार - एम. डी. हरिहर मयेकर

महाराष्ट्रातील पहिल्या एमकोल युनिटचा आज सासोलीत झाला शानदार शुभारंभ!
Edited by: संदीप देसाई
Published on: January 26, 2023 13:08 PM
views 282  views

दोडामार्ग : एमसीएल कंपनीचे दोडामार्ग बायोफ्युल्स कंपनीनने आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कंपनीत युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला.

कंपनीत कार्य करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ जिल्ह्यातील युवकांच्या माध्यमातून करणार असे एम. डी. हरिहर मयेकर यांनी सांगत प्रातिनिधिक स्वरूपात काही युवकांना अपॉइंटमेंट लेटर्स दिलेत. एम. सी. एल. चे डायरेक्टर डॉ. लवेश जाधव यांच्या हस्ते युवक, युवतीना बहाल केले जॉईनिंग लेटर्स.

सिंधुदुर्ग जिल्हा बेरोजगारी मुक्त करण्यासाठी दोडामार्ग बायोफ्युएल्स कंपनी प्रयत्न करेन, एम. डी. मयेकर यांचे प्रतिपादन.

 महाराष्ट्रातील पहिल्या एमकोल युनिटचा आज सासोलीत झाला शानदार शुभारंभ!