
सावंतवाडी : माजगाव मनविकास ग्रंथालयाच्या वतीने बुधवार दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत वाचन संस्कृती व मराठी भाषेच्या जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात विविध विषयावरील उत्तम पुस्तके वाचकांसाठी ठेवण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बचत गटाच्या प्रमुख स्नेहा साळगावकर या उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन व ग्रंथांचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत गुरुजी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या उपाध्यक्ष मीराताई कासार यांनी केले यावेळी गावातील विद्यार्थी वर्ग आवर्जून उपस्थित होता. श्री विनोद जाधव साहेब सूर्यवंशी यांच्यासह ग्रंथालयाचे पदाधिकारी व सेवकवर्ग उपस्थित होता.
प्रमुख पाहुणे सौ साळगावकर, अध्यक्ष श्री सावंत गुरुजी, उपाध्यक्ष कासार यांनी उपस्थित मंडळींना वाचन संस्कृती व मराठी भाषेचे महत्व आपल्या उत्तम वकृत्व शैलीत सांगितले. शालेय विद्यार्थी मंडळींनी या ग्रंथ प्रदर्शनातील उत्तम पुस्तकांचे अवलोकन केले. हे प्रदर्शन 30 जानेवारी 26 पर्यंत ग्रंथालयामधील वेळेत वाचकांसाठी सुरू आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता ग्रंथपाल मधु कुंभार, लिपिका रोशनी निब्रे, सेविका माया साळगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रंथालयातर्फे उपस्थिताना अल्पोपहार देण्यात आला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्था ग्रंथपाल मधु कुंभार यांनी केले.










