विशाल परब यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मायेचे छत्र'

Edited by:
Published on: June 16, 2024 12:19 PM
views 604  views

सावंतवाडी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून अनसुर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड उभारण्यात आले आहे. आज या निवारा शेडचा शुभारंभ स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत परब यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी या सेवेबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आभार व्यक्त करत त्यांचा सन्मान केला. 

समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही करण्याचा माझा कायमच प्रयत्न असतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या माध्यमातून आज उभारलेले ' मायेचे छत्र ' आजपासून खुले झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांचा आणि ग्रामस्थांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो, ही सदिच्छा या प्रसंगी परब यांनी व्यक्त केली.