मातोंड श्री देव रामेश्वराचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

Edited by: दिपेश परब
Published on: December 05, 2023 19:44 PM
views 212  views

वेंगुर्ला : तालुक्यातील मातोंड गावचे जागृत व प्रसिध्द देवस्थान श्री देव रामेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव उद्या बुधवार दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळपासून नारळ ठेवणे, केळी ठेवणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. यानंतर रात्री सवाद्य  श्री देवी सातेरी, श्री देव रवळनाथ यांच्या सहित तरंग देवतांचे रामेश्वर मंदिरात आगमन झाल्यानंतर पालखी पालखी सोहळा व  त्यानंतर रात्री १ वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तर या जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकर मंडळी यांनी केले आहे.