तालुकास्तरीय बाल कला - क्रीडा महोत्सवात मातोंड - गावठणवाडी शाळेचे यश

Edited by:
Published on: January 09, 2024 12:08 PM
views 231  views

वेंगुर्ला : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल कला- क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२३ च्या वेंगुर्ला तालुकास्तरीय स्पर्धा २ व ३ जानेवारी रोजी पार पडल्या. या महोत्सवा अंतर्गत घेण्यात आलेल्या लहानगट समूह नृत्य प्रकारात गावठणवाडी शाळेने प्रथम क्रमांक तर याच शाळेच्या श्रेयस श्रीकृष्ण वडाचेपाटकर याने उंच उडी लहान गट (मुलगे) प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. 

३ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या हस्ते शाळेचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, मातोंडच्या सुकन्या तथा वजराट सरपंच अनन्या पुराणिक यांच्यासाहित शिक्षक, पालक उपस्थित होते.  या यशाबद्दल विस्तार अधिकारी श्रीम. भेकरे, केंद्रप्रमुख लवू चव्हाण यांच्यासाहित सर्व स्तरावरून शाळेचे अभिनंदन होत आहे. तसेच हे यश मिळवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. जाधव, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालकवर्ग, केंद्रातील शिक्षकवर्ग, ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. समूह नृत्यासाठी ओंकार परब यांचे मार्गदर्शन लाभले.