आता सामुहिक आत्महत्येशिवाय पर्याय नाही !

गोकुळदास बोंद्रे छेडणार आमरण उपोषण !
Edited by: लवू परब
Published on: August 07, 2024 13:17 PM
views 189  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहरात अनधिकृत बांधकाम हॉटेल हे माझी संमती न घेता. पदाचा गैर वापर करत  नगरसेवक संतोष नानचे यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. वारंवार नगरपंच्यातला कळवून निवेदने देऊन सुद्धा त्यावर कारवाई करत नाही. या अनधिकृत बांधकामामुळे बेघर झाले आहे. त्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला आत्महत्ते शिवाय पर्याय नाही असे गोकुळदास बोन्द्रे यांनी म्हटले आहे.

 त्यांनी येथील कसई दोडामार्ग नगरपंचायतला निवेदन दिले आहे. त्या निवेदनात असे म्हटले की माजी नगराध्यक्ष वविद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी आपल्या पदाचा गैर वापर करून  क्र. 1237 हे हॉटेल अनधिकृत पणे आपली परमिशन न घेता बांधण्यात आलेले आहे. कोरोना काळात लॉकडाऊनचा फायदा घेत  नानचे  यांनी अतिक्रमण केले आहे. अनधिकृत बांधकाम  अतिक्रमण करणारे संतोष दिनकर नानचे या नगरसेवकावर नगरपंचायतने कोणतीही कारवाही केली नाही. याउलट माझे घर कोविड महामारीचा फायदा घेत तोडून स्वतःच हॉटेल बांधले. आज त्याच घराचा असेसमेंट रद्द करून स्वतःचे अतिक्रमण लपविण्याचा प्रयत्न करत आहे. तरी प्रशासनाकडून कोणतीही कारवाही झाली नसल्याने माझे कुटुंब बेघर झालेलं आहे तरी मला आणि माझ्या कुटुंबाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे तसेच आमदार दीपक केसरकर यांनी न्याय मिळवून द्यावा. अन्यथा माझ्या कुटंबीयांना सामूहिक आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही असे म्हटले आहे.