
सावंतवाडी : आरंभ सखी ग्रुप तर्फे सावंतवाडीत प्रथमच गुढीपाडव्यानिमित्त महिला ढोल पथकासह महिला बाईक रॅली आयोजित केली आहे. या शोभायात्रेची सुरुवात मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता राजवाड्यातून होणार आहे. हर हायनेस शुभदादेवी भोंसले तसेच युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या शुभहस्ते याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. वाचन मंदिर ,जयप्रकाश चौककडून मार्गस्थ होणाऱ्या या यात्रेचा जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानाकडे समारोप होणार आहे. या शोभायात्रेत सावंतवाडीतील महिलांचे ढोल पथक, महिलांचे लेझीम पथक ,लाठीकाठी ,पोवाडा ही विशेष आकर्षणे आहेत. तरी या शोभायात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बाईक रॅलीमध्ये जास्तीत जास्त महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे असे आवाहन आरंभ सखी ग्रुपचे सदस्य देवता हावळ ,दर्शना रासम, प्रज्ञा नाईक, नेहा माडगावकर, पल्लवी रेगे, संजना देसकर स्मिता नार्वेकर ,संगीता शेलटकर,भारती देशमुख यांनी केले आहे .