माजगाव प्राथमिक शाळेत साजरा होणार मराठी भाषा गौरव दिवस

Edited by: विनायक गावस
Published on: February 26, 2024 11:32 AM
views 56  views

सावंतवाडी : माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालय माजगाव व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ येथे 28 फेब्रुवारीला दुपारी ३ वा.मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी ग्रंथालय मार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच मराठी भाषा दिन विषयी मार्गदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच डॉ. अर्चना सावंत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे माजी तालुकाध्यक्ष इतिहासकार प्रा. डॉ. जी. ए. बुवा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अँड. संतोष सावंत, उपसरपंच संतोष वेजरे, मुख्याध्यापक एस. बी. सावंत, आर. के. सावंत, बी. एस. चौरे, पोलीस अधिकारी लोकेश कानसे, गुंजाळ, सिद्धेश कानसे, मिलिंद कासार आदी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन माजगाव ग्रंथालय तर्फे करण्यात आले आहे‌.