कणकवली कॉलेजचा बारावीचा निकाल ९४.२१ टक्के

सर्व विभागांमध्ये विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
Edited by:
Published on: May 02, 2026 18:25 PM
views 41  views

कणकवली : येथील कणकवली कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल यंदा ९४.२१ टक्के लागला आहे. एकूण ५७० विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी ५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शास्त्र विभागात २५८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २५३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.०६ टक्के लागला आहे.

प्रथम – सुकन्या संजय राणे (९१.६७%)

द्वितीय – सोहम संजय परब (९०%)

तृतीय – पूर्वा महादेव प्रभूदेसाई (८९.३३%)


कला विभागात ८६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९३.०२ टक्के लागला आहे.

प्रथम – सई सूर्यकांत सावंत (८९.५०%)

द्वितीय – सर्वेश सचिन शिरसाट (८७.५०%)

तृतीय – मनस्वी यतीन देसाई (८४.६७%)


वाणिज्य विभागात २०६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १८४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ८९.३२ टक्के लागला आहे.

प्रथम – प्रतिक्षा संजय पाटील (९२.८३%)

द्वितीय – आदिती दामोदर खानोलकर (९०.८३%)

तृतीय – राज स्वप्नील वळंजू (९०.५०%)


व्होकेशनल विभागात २० विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला आहे.

प्रथम – मेहेक प्रमोद चव्हाण (८९.५०%)

द्वितीय – माही प्रमोद चव्हाण (८८.३३%)

तृतीय – कुबेर विश्वनाथ पाटील (८७.५०%)


एकूणच कणकवली कॉलेजने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत सर्व विभागांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.