कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजचा १२ वीचा निकाल ९९.१३ टक्के

Edited by:
Published on: May 02, 2026 18:08 PM
views 36  views

कुडाळ: कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९९.१३ टक्के लागला असून, वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी बागलकर गायत्री विवेकानंद ९५.६७ टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिली आली आहे.

विज्ञान, वाणिज्य, कला आणि व्होकेशनल या चारही शाखांमधील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. प्रत्येक शाखेतील प्रथम तीन क्रमांक खालीलप्रमाणे....

वाणिज्य शाखा 

प्रथम: बागलकर गायत्री विवेकानंद (९५.६७%)

द्वितीय: दळवी पूनम दिनेश (९४.१७%)

तृतीय: रावले जान्हवी प्रसाद (९३.८३%)


विज्ञान शाखा

प्रथम: लाड द्राम हनुमंत (९२.५०%)

द्वितीय: गावडे आर्या अजय (८६.३३%)

तृतीय: परब सुजल सीताराम (८५.३३%)


कला शाखा 

प्रथम: फर्नांडिस सानिया एडवर्ड (८३.५०%)

द्वितीय: मळगांवकर पद्मनाभ सुरेंद्र (८१.६७%)

तृतीय: गोसावी दिया उदय (८०.१७%)


व्होकेशनल शाखा  

प्रथम: तेंडोलकर वैशाली विठोबा (८०.००%)

द्वितीय: तेंडोलकर अदिती दत्ताराम व परब वैभवी नंदकिशोर (दोन्ही ७६.६७%)

तृतीय: खोत मोहन श्रीकृष्ण (७३.१७%)


या वर्षीच्या परीक्षेत विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी आयटी विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे. विद्यालयातून एकूण ४५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ४५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


वाणिज्य आय.टी: बागलकर गायत्री विवेकानंद

विज्ञान आय.टी: परुळेकर आर्या महेश

शाखानिहाय निकालाची टक्केवारी खालीलप्रमाणे

विज्ञान शाखा: १००% (१७४ पैकी १७४ उत्तीर्ण)

व्होकेशनल शाखा: १००% (२६ पैकी २६ उत्तीर्ण)

वाणिज्य शाखा: ९८.७८%

कला शाखा: ९७.८७%

या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि शिक्षक वृंदाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. कुडाळ परिसरात या निकालामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.