सावंतवाडीत भगव वादळ !

Edited by: विनायक गावस
Published on: November 08, 2023 16:34 PM
views 750  views

सावंतवाडी : मराठा समाजालख  आरक्षण मिळण्यासंदर्भात सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच मराठा समाज नेते मनोज जरंगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी सावंतवाडी तालुका मराठा समाज यांच्यावतीने शहरातून भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात सावंतवाडी राजवाडा येथून करण्यात आली.

या बाईक रॅलीमध्ये सावंतवाडी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासून अवकाळी पावसाने जोर धरला होता तरीसुद्धा मराठा समाज बांधव भगव्या टोप्या, भगवे झेंडे घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा..आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं, जय भवानी जय शिवाजी.. अशा घोषणानी सावंतवाडी शहर दुमदुमून गेले. रॅलीची सांगता सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाकडे झाली‌.