मराठा समाजाची आज बैठक ; लोकसभेसाठी उमेदवार देणार ?

Edited by: भरत केसरकर
Published on: April 02, 2024 06:09 AM
views 180  views

सिंधुदुर्ग : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी झालेल्या मराठा आरक्षण राज्यस्तरीय बैठकीमधील ठरावाप्रमाणे महाराष्ट्र राज्यात प्रत्येक लोकसभा मतदार संघात मराठा उमेदवार उभे करण्याचे सर्वानुमते ठरले आहे. या संदर्भात सिंधुदुर्गची दिशा ठरविण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग तर्फे आज मंगळवारी  संध्याकाळी ५:०० वाजता मराठा समाज हॉल कुडाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव यांनी ठराव आणि संकल्पना मांडण्यासाठी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.सुहास सावंत यांनी केले आहे.

या उमेदवारीबाबतीत अंतिम निर्णय हा ७ एप्रिल २०२४ च्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या  राज्य कार्यकारिणीच्या कराड येथील बैठकीत होणार आहे. याबाबत मराठा महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी कडून सांगण्यात आले आहे. मराठा महासंघाने जर सिंधुदुर्गात उमेदवार उभा केला तर इंडिया आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढू शकते. आजच्या बैठकीकडे संपूर्ण सिंधुदुर्ग- रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. हा उमेदवार कोण असेल याचीही  उत्सुकता लागून राहिली आहे.