झिरंगवाडीतील अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 19, 2023 19:34 PM
views 219  views

सावंतवाडी : कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत झिरंगवाडी येथील अठरा युवक व सहा महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ हाती बांधलं. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडीत आपली ताकद दाखवून देईल असा विश्वास माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केला. 

तर महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत या प्रवेशानं आगामी काळात पक्षाला बळ मिळेल असं मत व्यक्त केले. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जावेद खतीब, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नजीर शेख, अल्पसंख्यांक सावंतवाडी तालुकाध्यक्ष जावेद शेख, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष युक्तिकार राजगुरू, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, महिला निरीक्षक रत्नागिरी जिल्हा दर्शना बाबर देसाई, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी, युवक तालुकाध्यक्ष हर्षद बेग, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, सौ. मारिता फर्नांडिस, जिल्हा सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापार याकूब शेख, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर आदी उपस्थित होते.