सिंधुदुर्गातून पहिली मराठा टीम उद्या रवाना होणार

Edited by: लवू परब
Published on: September 01, 2025 14:05 PM
views 1360  views

दोडामार्ग : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चार दिवस पूर्ण झाले असून मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. शासनाकडून ठोस निर्णय न घेतल्याने समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्यभरातून या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून आता सिंधुदुर्गातूनही आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी पहिली मराठा टीम उद्या रवाना होणार आहे.

या टीमचं नेतृत्व शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी करणार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत समाज मागे हटणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही आणि पुढील दिवसांत संघर्ष अधिक तीव्र केला जाणार असल्याचा इशाराही धुरी यांनी दिलाय.