मनोहर जोशींनी नेहमीच सामान्यांसाठी काम केलं : अजय कुमार सर्वगोड

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 26, 2024 08:12 AM
views 62  views

कणकवली : डॉ. मनोहर जोशी सर गेले ही बातमी ऐकून मला मनस्वी दुःख झाले. अतिशय हुशार बुद्धिवान दूरदृष्टी असणारा अणि विशेष म्हणजे कठोर शिस्तीचं पालन करणारा नेता हरपला ही वेदनादायी गोष्ट असल्याचं अजय कुमार सर्वगोड यांनी सांगितले.

२१ जून 1996 ला दासगाव महाडला जिल्हा रायगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते आले होते. आपण त्यावेळी महाड मध्ये शाखा अभियंता होतो. 14 वर्षे रखडले प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मी अणि माझे उपअभियंता दीक्षित यांनी ६ महिन्यात केलं होत. हे प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगराच्या कुशीत आहे. अतिशय सुरेख आणि देखणी इमारत  बांधण्यात आली होती. त्यावेळी डॉ. मनोहर जोशी यांनी इमारत बांधकामचं कौतुक केलं होत.  आपला सत्कार सुद्धा करण्यात आला होता तसेच आपलं कौतुक सुद्धा केल्याचं त्यांनी सांगितले.

डॉ. जोशी सर यांनी मुख्यमंत्री असताना एक रुपयात झुणका भाकर, घर तिथे शौचालय, पाणी पुरवठा योजनेसारखी स्वतंत्र खाते निर्माण केले अणि भरघोस निधी सुधा उपलब्ध करून दिला. अशा अनेक आठवणी सर्वगोड यांनी जागवल्या.