
सावंतवाडी : शहरातील मनीष देसाई या कॉलेज युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सावंतवाडीतील सुजाण नागरिकांच्यावतीने करण्यात आली.
काम सुरू असताना सूचनाफलक लावले नाहीत. कामावर माणसे तैनात केली नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्मचारी तेथे हजर नव्हते. त्यामुळे ठेकेदार, चालक व सार्वजनिक बांधकाम विभागाचा संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा मागणी यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी कांबळे यांच्याकडे करण्यात आली. कांबळे यांनी त्वरित याबाबतचे कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर सावंतवाडीतील सुजाण नागरिकांनी पोलिसांना घातलेला घेरावा मागे घेतला. त्यावेळी तपसी अंमलदारावर प्रश्नांची सरबत्ती सरबत्ती करण्यात आली. ठाणे अंमलदाराने जावक क्रमांक ,कोणते कलम न घालता गोवा मुंबई येथे ओसी पाठवल्याने ती परत पाठवण्यात आली व यात दोन दिवस गेले पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा त्यामुळे दिसून येते गोवा पोलिस अशा वेळी महाराष्ट्राच्या पोलिसांची लाज काढतात व त्यावेळी आमच्या माना लाजेने खाली जातात असे एकनाथ नाडकर्णी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तर सीताराम गावडे यांनी या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर सामूहिक कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी केली.
बबन साळगावकर यांनी पोलिस प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर , भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग, माजी जि प बांधकाम सभापती एकनाथ नाडकर्णी,माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर ,सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे ,राजू धारपवार व माजी नगरसेवक सुरेश भोगटे ,शब्बीर मणियायशर,शैलेश गंवडळकर उपस्थित होती.