माणगाव शाळेत शिकायला मिळालं हे भाग्य : मनीष दळवी

Edited by: भरत केसरकर
Published on: January 06, 2024 12:13 PM
views 585  views

कुडाळ : शाळेमध्ये माझ्यावर जे संस्कार झाले ते माझ्या जीवनात अत्यंत उपयोगी ठरले.मी आज जो इथे पर्यंत पोहचलो ते माझ्या माणगाव हायस्कूल या शाळेमुळेच. पाचवी पासून बारावीपर्यंत मला माणगाव सारख्या पुण्यभूमीत श्री.वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या शाळेत शिक्षण घेता आलं. हे मी माझं भाग्य समजतो. त्यामुळे शाळा,शिक्षक यांचा मी नेहमीच ऋणी राहीण.आपण स्वतःला कमी न लेखता  जिद्द,चिकाटी आणी परिश्रम केले तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन असं तथा माणगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी मनीष दळवी यांनी केले.

       माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री.वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मनिष दळवी व्यासपीठावरून बोलत होते.यावेळी ते म्हणाले ज्यावेळी जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी मी विराजमान झालो त्यावेळी मी शाळेमध्ये मला शिक्षकांनी शिकवलेल्या प्रत्येक घटनेची आणि त्याकाळी केलेल्या संस्कारांची आठवण येत होती. इतर ठिकाणी केवळ शिक्षण दिले जाते.मात्र माणगाव हायस्कूलमध्ये प्रत्यक्ष शिक्षणाबरोबर संस्काराचे धडे दिले जातात.येथील शिक्षणाबरोबर चांगले संस्कार झाल्यामुळेच मी जीवनात उभा राहिलो आणी मोठा झालो.माणगाव हायस्कूल मध्ये संस्काराचे शिक्षण दिले जाते. याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे.सौ.पंडित मॅडम हे मला बोटाला धरण पाचवी मध्ये शिकण्यासाठी घेऊन आले. आणि त्यानंतर तब्बल आठ वर्षे मी या शाळेत शिकलो. माझं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण येथे पूर्ण केलं. तुमच्यासारखाच मी अशा कार्यक्रमांना या शाळेतील येथील मंडपात मागील बेंचवर बसून भाषण ऐकत असायचो. माझी राजकीय कारकीर्द कशी निर्माण झाली असेल?याच तुम्हाला कौतुक वाटेल. बारावीच्या निरोप समारंभाला मी भाषण केलं आणि तेच माझं राजकीय भाषण झालं होतं.आणि याच माझ्या भाषणाला सगळ्या शिक्षकांनी पाठिंबा दिला होता. आणि तीच माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. आज मी जीवनात यशस्वी होऊन या व्यासपीठावर भाषण करतोय यासारखा दुसरं कुठलाच आनंदाच क्षण असू शकत नाही.असे प्रतिपादन मनिष दळवी यांनी करताच अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये मनिष दळवी  यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आनंदाश्रू तरळलेले पाहायला मिळाले. यावेळी भाषण करताना मनीष दळवी चांगलेच भावूक झाले होते.

   यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे सीईओ वि.न.आकेरकर,प्रमुख पाहुणे निवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशिलकुमार शिवलकर, माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था उपाध्यक्ष दत्ताराम जोशी,सचिव एकनाथ केसरकर,सहसचिव महेश भिसे,महाविद्यालय संस्था प्रतिनिधी चंद्रशेखर जोशी,स्कूल कमिटी सदस्य विनायक नानचे,दत्तदिगंबर धुरी,अंतर्गत हिशेब तपासणी साईनाथ नार्वेकर,मुख्याध्यापक प्रशांत धोंड,उपमुख्याध्यापक संजय पिळणकर,पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण,माणगाव सरपंच सौ.मनिषा भोसले,श्री देवी यक्षिणी विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद साटम,दत्ताराम आंबेरकर,राजन पिंगुळकर,सीमा सावंत,आनंद कदम,आल्हाद शिरसाट,सेलेस्तीन शिरोडकर उपस्थित होते. 

उपस्थित होते.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी यांच्या हस्ते झाले.

 मनिष दळवी यांचा माजी विद्यार्थी आणी जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून शाल,श्रीफळ देवून संस्थेच्या व शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी मनिष दळवी यांनी शाळेला ५१ हजारांची आर्थिक रोख देणगी दिली. तर निवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी दहा हजारांची देणगी दिली.

      यावेळी सूत्रसंचालन महेश पास्ते, देवयानी टेमकर, सीमा पाटील यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रशांत धोंड, आभार प्रदर्शन चंद्रकांत चव्हाण यांनी केले. शालेय अहवाल वाचन गिरीष गोसावी यांनी केले. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमासाठी कॅन्टीन चालक सौ.शुभांगी विजय मुंज आणी विजय मुंज यांनी मोफत अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.

         या कार्यक्रमात गुरुंचा सत्कार शिष्याकडून होताना पाहायला मिळाला.सन 2000 ते 2001 चे इलेक्ट्रिक विभागाचे या प्रशाचे माजी विद्यार्थी मनीष दळवी यांनी लवकरच सेवानिवृत्त होणारे आपले शिक्षक राजन पिंगुळकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. शाळेचा एक माजी विद्यार्थी एवढा मोठा झालेला बघून सगळ्यांना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी माणगाव हायस्कूल मध्ये उपस्थित शिक्षक बांधवातून व्यक्त होत होती. मनीष दळवी हे पाचवीमध्ये माणगाव हायस्कूलमध्ये दाखल झाले. पाचवी ते सातवी प्राथमिक शिक्षण व आठवी ते दहावी माध्यमिक शिक्षण या शाळेत त्यांनी पूर्ण केले. यानंतर अकरावी आणी बारावी मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक विभागातून पूर्ण केले. माणगाव हायस्कूल समोरच असलेल्या धुरी ह्या नातेवाईकाकडे ते शिक्षणाच्या निमित्ताने राहत होते. मनीष दळवी यांना आज एवढे मोठे झालेले बघून सर्वांनाच आनंद होत होता. माणगाव  हायस्कूलचा विद्यार्थी जिल्हा बँकेचे चेअरमन पदी विराजमान होतो. हे आपल्या शाळेचे यश असल्याचे उपस्थितांनी मनोमन भावना व्यक्त केल्या. शाळेत असतानाचा  नम्रपणा आणि आपल्या शिक्षकांबद्दल असलेला आदर, आजही व्यासपीठावर बसल्यानंतर मनीष दळवी यांच्यामध्ये जाणवत होता. त्यामुळे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीचा प्रत्येक आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला.