काजू प्रक्रियेसाठी जिल्हा - राज्याबाहेर न जाण्यासाठी प्रयत्न करणार : मनीष दळवी

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 29, 2023 20:36 PM
views 60  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काजू जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर प्रक्रिया करण्यासाठी न जाण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपदन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी काजू व्यापारी व प्रक्रिया धारकाच्या बैठकीत केले.


सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत आयोजित करण्यात आलेली काजु व्यापारी व प्रकियाधारक याची सभा जिल्हा बँक सभागृहात जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या  प्रमुख उपस्थित व बाजार  समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली  तसेच महाराष्ट्र राज्य काजु असोशीएशनचे अध्यक्ष सुरेश बोलवलेकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत संपन्न झाली.


यावेळी सभाध्यक्ष  रावराणे यांनी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा व भविष्यात बाजार समितीच्या वाटचाली संबधी सविस्तर मार्गदर्शन केले .त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्हासाठी लवकरात लवकर मार्केटयार्ड उभारण्यात येईल. तसेच शेतमाल तारण योजना प्रभावी पणे राबविण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यामातुन लागणारी आर्थीक मदत बॅक देण्यास तयार आहे. तसेच जिल्हातील सर्व व्यापारी व काजु कारखानदार यांना जास्तीत जास्त आर्थीक मदत केली जाईल. यामुळे जिल्हातील व्यापार व कारखानदार यांची उन्नती होवुन आपोआप शेतक- याच्या शेतमालास योग्य भाव मिळेल. त्यांच बरोबर तालुकास्तरावर जर जागा उपलब्ध झाल्यास बाजार समितीचे सब मार्केटयार्ड उभारण्यात येतील. व सिंधुदुर्ग जिल्हातील काजु बाहेरच्या जिल्हात किंवा राज्यात न जाता तो काजु आपल्या जिल्हात जास्तीत जास्त प्रकीया होण्यासाठी व बाजार समिती व जिल्हा बँक सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. असे मत त्यांनी मांडले.


महाराष्ट्र राज्य काजु असोशीएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी काजु कारखान्याची आजची असलेली परिस्थीती यावर त्यांनी चर्चा केली. काजु व्यापा-यामधुन प्रमोद भोगटे, मिलींद खाडये, योगेश काणेकर, इत्यादी तसेच कारखानदारामधुन नेरकर, सुधीर झांटये, अंकुश गावडे, शैलेश डिचोलकर इ. भाग घेतला . ब-याच व्यापारी / काजुकारखानदार यांनी त्यांच्या शंकाचे निरसन केले. सदरची सभा ही ब-याच वर्षानी झाल्यामुळे बहुसंख्य व्यापारी व कारखानदार उपस्थीत होते. सभा व्यापारी व कारखानदारानी बाजार समितीला सहकार्य करण्याची भावना व्यकत केली. व भविष्यात असेच बाजार समितीचे व सिंधुदुर्ग बॅक ,सिंधुदुर्गातील काजु व्यापारी,कारखानदार यांच्या माध्यामातुन जिल्हामध्ये कार्यक्रम घेण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. शेवटी बाजार समितीचे सभापती यांनी सर्व उपस्थीत मान्यवरांचे आभार मानले. 

  या सभेला उपसभापती  श्रध्दा सावंत,  व संचालक आनंद ठाकुर  सुजाता देसाई, मंगेश ब्रम्हदंडे, किरण रावले, मकरंद जोशी,  सदानंद सर्वेकर, अशोक पराडकर, प्रदीप मांजरेकर, सुर्यकांत बोडके, इ बाजार समितीचे पदाधिकारी व शंकर वळंजु, झांटये, नेरकर, राणे, गावडे, डिचोलकर, राजेश बांदेकर, पुंडलिक शेटये, नवीन बांदेकर, शमशुददीन काझी इत्यादी, काजु व्यापारी व कारखानदार उपस्थीत होते.