
वेंगुर्ले : जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज (८ जून) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे व सौ. नीलम राणे यांनी मनिष दळवी व कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रमोद रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, मच्छिमार नेते वसंत तांडेल, जि प माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, कमलेश गावडे, नितीन चव्हाण, राजबा सावंत, सायमन आल्मेडा, समीर कुडाळकर, ज्ञानेश्वर केळजी, राजू परब, शेखर परब, राहुल पै आदी उपस्थित होते.