मनिष दळवी यांना सहकार 'कोकणरत्न' पुरस्कार प्रदान

Edited by:
Published on: December 14, 2024 10:46 AM
views 341  views

 सिंधुदुर्गनगरी : सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करुन देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार 'कोकणरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

मनिष दळवी यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी ग्राहक हित लक्षात घेऊन बँकेची सेवा अधिकच गतीमान केली असून शेतकऱ्यांना शेतीपूरक  व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध योजना अमलात आणत त्यांनी वित्तीय सहकार्य केले त्यामुळे येथील शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आणि नवीन तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करून शेती तसेच दुग्ध उत्पादन वाढीसाठी पाठबळ दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.   

जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात आज कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या वतीने प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत व प्रकल्प समन्वयक  शशिकांत कासले यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक समीर सावंत, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच बँकेचे सरव्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.