'ती' धोकादायक झाडे हटवण्याची मंगेश तळवणेकरांची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: July 25, 2024 11:47 AM
views 67  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील जिमखाना ते उभागुंडा स्टॉप येथील घळणीवर अतिशय धोकादायक झाडे असून कोणत्याही क्षणी ती पडू शकतात. हल्लीच त्यातील दोन झाडे पडलेली आहेत. त्यामुळे  सार्वजनिक बांधकाम उपविभागाने ही झाडे हटवावित अशी मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता यांच्याकडे केली आहे.

ते म्हणाले, शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी स्वत: खर्च करुन पोलीस बांधवांच्या घरावर व वसाहती मधील रस्त्यावरची झाडे हटवून घेतली आहेत. ते खरोखरच कौतुकास पात्र आहेत. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्याकडून त्वरीत निधी उपलब्ध करुन घेऊन संपूर्ण सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडे हटवण्यासाठी भरीव आथिर्क तरतुद करावी अशी विनंती मंगेश लक्ष्मण तळवणेकर यांनी केली आहे.