मंगेश मेस्त्रीस गांधर्व महाविद्यालयाचा पुरस्कार जाहीर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2023 15:24 PM
views 116  views

सावंतवाडी : सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडी चा हार्मोनियम / कीबोर्ड वादक कु. मंगेश रामचंद्र मेस्त्री यांस अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, वाशी मुंबई यांच्या तर्फे घेण्यात येणाऱ्या संगीत विशारद हार्मोनियम या विषयामध्ये सर्वाधिक गुण मिळवल्या बद्दल गांधर्व महाविद्यालया तर्फे "सौ. नलिनी प्रताप कानविंदे पुरस्कार जाहीर झाला आहे. 

अगदी लहान वयात मिळवलेल्या या यशाबद्दल मंगेशचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्याचे मार्गदर्शक, गुरू व सद्गुरु संगीत विद्यालयाचे संचालक गुरूवर्य निलेश रघुनाथ मेस्त्री व मंगेशच्या पालकांचे विशेष अभिनंदन त्याच्या या यशासाठी होत आहे. हा पुरस्कार 'अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय' यांच्या तर्फे असल्यामुळे या पुरस्काराला विशेष महत्व आहे.