
दोडामार्ग : तालुक्यातील मांगेलीत कुसगेवाडी येथे मांगळवारी मध्यरात्री भूस्खलन होऊन संपूर्ण दरड रस्त्यावर आली. माती आणि झाड रस्त्यावर कोसळली. यामुळे येथील मार्ग बंद झाला. गावात सकाळीच येणारी बस आता दुपारपर्यंत म्हणजे जवळपास ५ तासापासून तिथच अडकून पडली. त्यामुळे विद्यार्थी कामाला जाणाऱ्या नागरीकांचे मोठे हाल झालेत.
त्यानंतर आता दुपारपर्यंत रस्ता मोकळा करण्याच काम सुरु करण्यात आले . जेसीबी च्या सहाय्याने हा रस्ता मोकळा केला या घटनेची माहिती मिळताच ठाकरे सेनेचे जिल्ह्याप्रमुख बाबुराव धुरी हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करत महसूलच्या अधीकाऱ्याना रस्ता तत्काळ मार्ग खुला करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांच्या सोबत तालुका प्रमुख संजय गवस, युवासेना तालुका प्रमुख मदन राणे, युवा सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे, संदेश गवस, लक्ष्मण आयनोडकर, सचिन केसरकर, राष्ट्रवादि चे तालुका प्रमुख प्रदीप चंदेलकर, गौतम महाले, उल्हास नाईक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
काळ्या दगडाच्या कॉरी मुळे मांगेली धोक्यात
मुसळधार पावसासमुळे या ठिकाणी बऱ्याच भागात डोंगराला भेगा गेल्या आहेत. तर येथील काळ्या दगडाच्या कॉरी मुळे मोठ्या प्रमाणात ब्लास्स्टिंग होत असल्याने हा मोठा अपघात घडला असे येथील सामाजिक कार्यकर्ते व मांगेली येथील राहिवाशी सुनील गवस यांनी म्हटले आहे तर याला संपूर्णतः महसूल विभागचं जबाबदार असल्याचेही ते म्हणाले मागच्या वेळी याच ठिकाणी याच कॉरीत ब्लास्टिंग होऊन एकाला आपला प्राण गमवावा लागला होता हे सर्व महसूलला माहीत आहे तरी देखील महसूल विभाग त्या कॉरी मालकाला पाठीशी घालत आहे. आणि आजच्या घटनेला सर्वस्वी शासनच जबाबदार आहे असा माझा थेट आरोप आहे असे गवस म्हणाले.
नागमोडी वळणे सोडून सरळ रस्ता करा : ग्रामस्थ !
घडलेल्या प्रकार पाहता त्या घटना स्टळावरून अर्ध किलोमीटर मांगेली कुसगेवाडी गाव आहे नशीब बर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आता ज्या ठिकाणी दरड पडली आहे त्या बाजूचा रस्ता हा आता मोठ्या पडणाऱ्या पावसातही पडणार आहे. त्तामुळे या ठिकाणची नागमोडी वळणे कट करून सरळ सुरक्षित रस्ता करून द्या अशी मागणी येथील ग्रामस्तानी बांधकाम विभागाकडे केली आहे .
5 तास एसटी अडकली
दरम्यान मंगळवारी मध्य रात्री घटना घडल्यामुळे कोणालाच याची कल्पना नव्हती मांगेली येथे वस्तीसाठी गेलेली एसटी बस सकाळी 6 वाजतां दोडामार्गला यायला निघाली तर रस्त्यावर मातीचा धिगारा दिसून आला ही माहिती गावांत समजताच गाववाल्यानी घटना स्थळी जाऊन पाहिलं तर मातीचे धिगारे दिसलें पण मनुष्य बळाने कोणतेच काम हाऊनशकल्याने रस्ता जवळपास 6 ते 7 तास बंद राहिला त्यात एसटी बस ही अडकून पडली त्यामुळे येथील प्रवाशिही अडकून पडले. त्या प्रवाशांना पर्यायी वाहणाची कोणी व्य्वस्था केली नसल्याने येथील कामाला जाणाऱ्या सर्व नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली