मांगेली देऊळवाडीतील श्री महालक्ष्मी देवता पुनः प्रतिष्ठापना सोहळा 17 ला

Edited by: संदीप देसाई
Published on: May 09, 2024 11:08 AM
views 260  views

दोडामार्ग  : मांगेली देऊळवाडी येथील श्री महालक्ष्मी देवता पुनः प्रतिष्ठापना सोहळा शुक्रवार  १७ ते - शनिवार १८ मे रोजी संपन्न होणार आहे.

यानिमित्त शुक्रवार दि. १७ मे रोजी  गणेशपूजा, संकल्प, पुण्याहवाचन, गंगापूजन, स्थलप्रकार शुध्दी, शांती होम, स्थानविधी, मंडप प्रवेश, शय्यदीवास, अग्निस्थापन वास्तूयाग, ग्रहयाग संपन्न होणार आहे. तर शनिवार दि. १८ मे रोजी सकाळी १०.२० वाजता मूर्तीप्रतिष्ठापना, तत्त्वन्यास, महापूजा, बलिदान, पुर्णाहूती, आरती, तीर्थप्रसाद व दुपारी महाप्रसाद. रात्री ८. वा. ३० मि. ग्रामस्थांचे सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन विठ्ठल गवस, रुक्मीणी गवस यांनी केले आहे.