श्री सौर दत्तयागाची शुक्रवारी सांगता !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 25, 2024 14:43 PM
views 55  views

कुडाळ : माणगाव येथील श्री दत्त मंदिर येथील शुक्रवारपासून सुरू झालेल्या श्री सौर दत्तयागाची सांगता उद्या होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.           

 माणगाव दत्त मंदिर येथे' श्री सौरदत्त याग 'निमित्त शुक्रवार २३फेब्रुवारी सकाळी ७-०० वाजले पासून श्री सौर दत्तयाग सुरू आहे.आज  रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी नैमित्तिक पूजा विधि, श्री सौरदत्त याग जपहवन दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद दुपारी १-०० वाजता कला संगम मंच शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदुर यांचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी २-०० वाजता योगेश बोरचाटे व सहकारी यांचा गायनाचा कार्यक्रम दुपारी ३-०० वाजता श्रीवा. स .विद्यालय ,माणगाव यांच्या गायनाचा कार्यक्रम ४-००वाजता पंडित रघुनाथ फडके यांच्या गायनाचा कार्यक्रम ६-३० वाजता आरती त्यानंतर श्रींचा पालखी सोहळा रात्री ९-०० वाजता ह. भ. प .भास्कर बुवा इंदुरकर नागपूर यांचे कीर्तन झाले.

सोमवार २६ फेब्रुवारी रोजी श्री दत्त मंदिर मध्ये सकाळी ८-०० वाजले पासून अभिषेक महापूजा श्री सौरदत्त याग बलिदान,पूर्णाहुती, महानैवेद्य आरती मंत्रपुष्प दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद दुपारी १-०० वाजता श्री द्विसाहस्त्री गुरुचरित्र व पंचपदी निर्मितीवर डॉ. त्रिवेणी थिटे माणगाव यांचे प्रवचन. त्यानंतर श्री सद्गुरु कृपा भजन मंडळ माणगाव श्री प्रकाश तामांणेकर व सहकारी यांचे भजन , कार्यक्रम दुपारी २-३० दामोदर मांजरेकर व सहकारी यांच्या गायनाचा कार्यक्रम ४-००वाजता श्री सिद्धेश कुंटे, श्री नीरज भोसले ,सिद्धेश सावंत यांचा ताल संध्या तबलासहवादन ,संवादिनी मंगेश मेस्त्री ५-००वाजता नेमळे हायस्कूलचे बहारदार गोप नृत्य सादर करते श्री नितीन धामापूर्कर व विद्यार्थी ६:४५ वाजता आरती, श्रींचा पालखी सोहळा रात्री ९-००वाजता ह .भ. प. श्री भास्कर व इंदुरकर नागपूर यांचे स्रूश्राव्य कीर्तन आदि कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद ,महाप्रसाद व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.