निलेश राणे यांच्या माध्यमातून माणगाव शहर नंबर वन बनविणार : सौ.दुर्वा दिपक काणेकर

भाजपने घेतली पाचही प्रभागात मोठी आघाडी
Edited by: भरत केसरकर
Published on: December 16, 2022 17:14 PM
views 258  views

कुडाळ : निलेश राणे यांच्या माध्यमातून माणगाव शहर नंबर वन बनविणार आहे.माणगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला व आपल्या सोबत उभ्या असलेल्या सदस्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.केंद्रात आणि राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आहे.. यामुळे माणगावचा विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे माणगाव गावचा विकास तुम्हाला अपेक्षित असाच करेन. असे आवाहन भाजप पुरस्कृत ग्राम विकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ दुर्वा दीपक काणेकर यांनी केला आहे. सौ.दुर्वा दिपक काणेकर यांच्यासह भाजपने पाचही प्रभागात मोठी आघाडी घेतली आहे.