कुडाळात रंगली मंगळागौर स्पर्धा

Edited by: भरत केसरकर
Published on: September 11, 2023 15:31 PM
views 144  views

कुडाळ : भाजपा नेते निलेश राणे पुरस्कृत भव्य मंगळागौर स्पर्धा महिलांच्या लक्षवेधी उपस्थितीत आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाली. मोदी@9 संकल्पनेतून व महिलांसाठीच्या मोदींनी कार्यान्वित केलेल्या योजना ही संकल्पना घेऊन 9 संघाची मंगळागौर स्पर्धा कुडाळ भाजपा कार्यालयासमोरील सिंधुदुर्ग राज्याच्या सभामंडपात अतिशय उत्साहात पार पडली.


यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, दत्ता सामंत, नवनिर्वाचित महिला जिल्हाध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, रुपेश कानडे, पप्या तवटे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत सौ.संध्या तेरसे यांनी केले. हा  दिमाखदार सोहळा संपन्न करण्यासाठी यशस्वी नियोजन व  आयोजन कुडाळ च्या महिला पदाधिकारी उषाताई आठल्ये, रेखा काणेकर,अदिती सावंत, साक्षी सावंत, प्रज्ञा राणे, साधना मांड्या, आरती पाटील, सुप्रिया वालावलकर, मुक्ती परब, तेजस्विनी वैद्य, विशाखा कुलकर्णी, अक्षता कुडाळकर, रेवती राणे, रचना नेरुरकर यांनी केले.


विजेते खालील प्रमाणे-प्रथम क्रमांक श्री नवदुर्गा संघ , कुडाळ रोख रक्कम रु.२१०००/- चषक आणि सहभाग प्रमाणपत्र,द्वितीय क्रमांक श्री सिद्धी गणपती संघ,कलाकट्टा रोख रक्कम रु.१५००० ,चषक व सहभाग प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक कुडाळेश्वर महिला संघ , कुडाळरोख रक्कम रु.१००००/- ,चषक व सहभाग प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ भैरव जोगेश्वरी संघ , कुडाळ रोख रक्कम ३०००/- चषक व सहभाग प्रमाणपत्र उत्तेजनार्थ सखी फुगडी संघ पालवी, रोख रक्कम ३०००/-,चषक व सहभाग प्रमाणपत्र,तसेच सहभागी इतर संघांना चषक व रु २०००/- मानधन देऊन सन्मान करण्यात आला.