उभादांडा जि.प. मर्यादित नमो चषक क्रिकेट स्पर्धेत मंगलदीप भेंडमळा संघ विजेता

Edited by:
Published on: January 23, 2024 09:16 AM
views 122  views

वेंगुर्ला : उभादांडा जिल्हापरिषद मर्यादित नमो चषक क्रिकेट स्पर्धेत मंगलदीप भेंडमळा संघ विजेता तर ओंकार आडारी संघ उपविजेता ठरला. या महाअंतिम सामन्याची नाणेफेक भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या शुभ हस्ते झाली.  या स्पर्धेत परबवाडा, उभादांडा, मोचेमाड, आसोली व सागरतिर्थ या गावातून एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेता मंगलदिप भेंडमळा संघास रोख रक्कम १५ हजार व नमो चषक तर उपविजेता ओंकार आडारी रोख रक्कम १० हजार व नमो चषक देऊन गौरविण्यात आले. 


    १९ जानेवारी रोजी वेंगुर्ला मंगलदिप भेंडमळा मैदान येथे माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते हा स्पर्धेचे उदघाटन पार पडले. ३ दिवस चालू असणाऱ्या स्पर्धेसाठी राजन तेली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आढावा घेत विविध योजनांची माहिती दिली. व जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आव्हान केले. यावेळी व्यासपीठावर मंडळ अध्यक्ष सुहास गवंडळकर, परबवाडा सरपंच क्षमिका बांदेकर, उपसरपंच पप्पू परब , विधानसभा संयोजक हेमंत गावडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनवेल फर्नांडिस, बाबली वायंगणकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, आसोली उपसरपंच संकेत धुरी, हितेश धुरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, वसंत तांडेल, निलेश मांजरेकर, संतोष सावंत, मारुती दोडशनत्ती, प्रणव वायंगणकर आदी उपस्थित होते.

   या स्पर्धेत अंतिम सामना सामनावीर म्हणून नवीन काळसेकर, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून राधाकृष्ण पेडणेकर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओंकार कुडाळकर व स्पर्धेतील मालिकावीर म्हणून नवीन काळसेकर यांना गौरविण्यात आले. या बक्षीस वितरण प्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषद माजी नगराध्यक्ष रजनजी गिरप, नमो चषक विधानसभा संयोजक हेमंत गावडे, मच्छिमार नेते वसंत तांडेल, विधान सभा प्रमुख हितेश धुरी, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, तुषार साळगावकर, परबवाडा ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, मंगेश गावडे, दादा तांडेल, अरविंद नवार, गुरुनाथ रेडकर, दादा काळसेकर, कमलकांत नवार, बाबल नाईक, राजन नवार, अरुण नवार, रुपेश नवार उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून बबी कानडे, इलियास आल्मेडा, वैभव नवार, र्अँथोनी रोड्रिक्स यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे समालोचन राजा परब, मंथन परब, जयेश परब यांनी केले. स्पर्धेच्या आयोजन साठी भेंडमळा संघाचे सहकार्य लाभले.