कोकण पदवीधरच्या उमेदवारीसाठी मंदार शिरसाटांचं नाव चर्चेत !

सिंधुदुर्ग युवासेनेची मागणी
Edited by: भरत केसरकर
Published on: May 09, 2024 06:23 AM
views 965  views

कुडाळ : युवासेना कोकण सचिव मंदार शिरसाट यांना कोकण पदवीधरची उमेदवारी मिळावी अशी सिंधुदुर्ग युवासेनेने मागणी केली आहे. मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर नोंदणी निवडणुक जाहीर व्हायच्या अगोदर नोंदणी सुरु केली होती. तसेच युवासेना कोकण सचिव मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली डी. एडच्या बेरोजगारांसाठी केलेल्या आंदोलनाची दखल महाराष्ट्राने घेतली. यावेळी गुन्हेही दाखल झाले.

अनेकवेळी तरुणांचे प्रश्न हाताळले त्यांना न्याय पण दिला. मंदार शिरसाट यांनी कुडाळ शहराचा कारभार पण उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष म्हणून उत्तमरित्या सांभाळला होता. युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने युवासेना कोकण सचिव मंदार शिरसाट यांना कोकण पदवीधरची उमेदवारी मिळावी, अशी युवासेना पक्षाकडे मागणी करणार आहे. युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर, युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, सावंतवाडी तालुकाप्रमुख कौस्तुभ गावडे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, दोडामार्ग मदन राणे, मालवण तालुकाप्रमुख मंदार गावडे, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरोसकर, युवासेना कुडाळ शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, कुडाळ शहर समन्वयक अमित राणे यांनी ही मागणी पक्षप्रमुखांकडे केली आहे.