मालवण ग्रामीण रुग्णालयातील असुविधांबाबत मंदार केणी आक्रमक

उपोषण छेडण्याचा प्रशासनास दिला इशारा
Edited by:
Published on: December 14, 2023 18:50 PM
views 110  views

मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालय अनेक आरोग्य सोई सुविधा यांची कमी आहे. मागणी पाठपुरावा करूनही रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याची स्थिती कायम आहे. गोरगरीब जनतेला सेवा सुविधा मिळत नसल्याने शासन, प्रशासनास जाब विचारण्यासाठी 27 डिसेंबर पासून मालवण ग्रामीण रुग्णालय समोर आमरण उपोषण छेडणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक मंदार केणी यांनी दिला आहे.

मंदार केणी यांनी रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मालवण रुग्णालय येथे आठवड्यातून एकदा नेत्रतपासणी व हाइड्रोसिल हर्निया तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध होतील असे सांगूनही आरोग्य प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. तरी ही सुविधा तसेच ऑपरेशन सुविधा जी नेवी आरोग्य शिबिर वेळी रुग्णालयात करण्यात आली ती नियमित स्वरूपात असावी. तसेच  काही औषधांचा तुटवडा रुग्णांना जाणवतो. तोही दूर व्हावा. या सर्व सणस्या प्रशनी शासन प्रशासन यांचे लक्ष वेधून जाब विचारण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालय समोर उपोषण छेडणार असल्याचे मंदार केणी यांनी सांगितले.