
सावंतवाडी : गोविंद चित्रमंदिर सावंतवाडी लगत राहणाऱ्या श्रीमती मंदाकिनी विजय पेडणेकर (वय ५८) हिचे आकस्मित निधन झाले. मधुमेहाचे प्रमाण अचानक वाढल्याने चक्कर येऊन त्या पडल्या. त्यानंतर लगेच मुंबई येथे मावशीच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत विझली.
कुंटुब महिला बालकल्याण विभाग मुंबई येथून तीन महीन्यापूर्वीच त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या.
माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, गणेश पेडणेकर, अरुण पेडणेकर चंद्रशेखर पेडणेकर यांच्या त्या चुलत बहीण होत्या.त्यांच्या पश्चात काकी, ३ बहिणी, वहीणी, भाचे, भाची असा मोठा पेडणेकर परिवार आहे.