आदि – गौरव चषकाचे शानदार उद्घाटन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 20, 2026 20:23 PM
views 149  views

मालवण : क्रिकेट क्लब आडारी मित्रमंडळ आयोजित ‘आदि – गौरव चषक’ खुल्या बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. मालवण येथील आडारी वाडी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून २० ते २४ एप्रिल या कालावधीत क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक सामने रंगणार आहेत. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये ७७,७७७ व चषक, द्वितीय पारितोषिक रुपये ३३,३३३ व चषक, तर तृतीय व चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी रुपये ५,००० व चषक असे आकर्षक बक्षिसांचे स्वरूप ठेवण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

आज झालेल्या उद्घाटन समारंभास नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेवक ललित चव्हाण, नागेश चव्हाण, आदित्य चव्हाण, गौरव कांबळी, हरिश्चंद्र ढोलम, विजय ढोलम, सिद्देश मांजरेकर तसेच क्रिकेट क्लब आडारी मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण ‘जुब स्टुडिओ लाईव्ह’ या यूट्यूब चॅनेलवरून करण्यात येत आहे. क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे