
कणकवली : कब्बडी क्षेत्रात उभ्या महाराष्ट्राने गौरवलेल्या यंगस्टार कब्बडी स्पर्धेत अखेर अटीतटीच्या लढतीत जय भारत मुंबई शहर संघाने नवरत्न क्रिडा मंडळ संघावर मात करत मानाच्या यंगस्टार चषकावर नाव कोरले. स्पर्धेतील अष्टपैलु खेळाडू म्हणून जय भारत संघाचा ओंकार मोरे तर शिस्तबंध्द संघ मुलुंड क्रिडा मंडळाला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प. पू. भालचंद्र महाराज स्टेडियमवर गेले तीन दिवस प्रकाशझोतात या स्पर्धा ठेवण्यात आल्या. रविवारी उत्तररात्री अंतिम सामन्याची रंगत क्रिडा रसिकांना पहायला मिळाली. स्पर्धेच्या पारितोषिक सोहळ्याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उद्योजक दयानंद उबाळे, मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे, आश्रयदाते अरुण जोगळे, अवी राऊळ, संजय बेलवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
३० व्या वर्षाच्या या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक सिद्धीविनायक क्रिडामंडळ उपनगर, चतुर्थ पारितोषिक नवोदित संघ, स्पर्धेतील उत्कृष्ट पकडपटू म्हणून अर्चित (नवरत्न), उत्कृष्ट चढाईपटू बावडेकर (जय भारत) यांना रोख रक्कमेसह चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम दिवशी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, वागदे सरपंच संदिप सावंत, कलमठ सरपंच संदिप मेस्त्री, राजन पारकर, डॉ. विनय शिरोडकर, गणेश तळगावकर, महेश कुडाळकर, सुशील पारकर, समीर प्रभूगावकर, सुभाष मालंडकर आदींसह विविध मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या दरम्याने अध्यक्ष अण्णा कोदे यांनी आपल्या मनोगतात मंडळाचे सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकिय, क्रिडा आदी उपक्रमांबदल आढावा घेतला. स्पर्धेची यशस्वी ३० वर्ष पूर्ण करत असताना कणकवली क्रिडाप्रेमी, आश्रयदाते व राज्यातील विविध नामवंत संघ, खेळाडू सहभागी होत असल्याने ही स्पर्धा प्रतिवर्षीच राज्यात लौकिकास पात्र ठरत आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे यांनीही स्पर्धे विषयी आपले मनोकत व्यक्त केले. स्पर्धेचे समालोचन बाळू वालावलकर व तर मालवणी समालोचक जयेश परब यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नंदू वाळके, रवी सावंत, बाबु वातकर, परेश परब, परेश वाळके, उदय यादव, किरण सावंत, नाना कोदे, भैय्या आळवे, रुपेश वाळके, हाि दक वाळके, अभिषेक चव्हाण, व्यंकटेश सावंत, अमोल पेडणेकर, मयूर पेडणेकर, ललित राणे, रुचिर ठाकूर, मंगेश म्हसकर, सचिन कामत, बाबु आर्डेकर, प्रथमेश पेडणेकर, बाळू पेडणेकर, रोहित मसूरकर, समीर देसाई, रुद्रेश लाडगावकर, चिन्मय माणगावकर, सुरज परब, संजय सावंत, योगेश कुलकर्णी, ओंकार खांडेकर, अमिता दळवी, प्रियांका कोरगावकर, सिद्धी घाडगे, माधुरी तेली, दुर्वा जाधव, मैथिली राणे, गायत्री झोपळे, यश लिंगायत, प्रधनेश पारकर, दुर्वांक पारकर, स्वप्नील म्हापणकर, हर्ष कुंभार, युवराज कदम, वृषभ सावंत यांनी मेहनत घेतली.










