
मालवण : शहरातील बस स्थानका नजिक असलेल्या सिताई कॉम्प्लेक्स परिसरातून लाल रंगाची फॅशन प्रो दुचाकी चोरीस गेल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली होती. भरवस्तीतील ही घटना घडताच मालवण शहरात काही काळ एकच खळबळ उडाली होती.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवून संबंधित युवक पुन्हा एसटी स्टँड आवारात आल्यानंतर नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला पकडून मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्या युवकास चौकशीसाठी पोलिस स्थानकात आणले. सदरची गाडी शहरातच सापडून आली होती. पोलिस चौकशीत सदर युवक देवगड तालुक्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी त्याच्या घरातील काका पोलिस स्थानकात उपस्थित राहून संबंधित युवकाचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे पोलिसांना सांगत त्याचे प्रमाणपत्र दाखविण्यात आले.










